लातूर - उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अन्न पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत दाखल होत आहेत. असाच प्रकार रविवारी सकाळी लातूर तालुक्यातील बाभळगावात घडला आहे. ग्रामस्थांना ऊसाच्या फडात दोन बिबटे आढळून आले होते. बिबट्याच्या शोधकरिता वनविभागाचे अधिकारी बाभळगावात दाखल झाले आहेत.
अन्नपाण्याच्या शोधात बिबट्या बाभळगाव शिवारात; वन विभागाकडून शोध सुरू - लातूर बिबट्या
लातूर शहरापासून अवघ्या 6 किमी अंतरावर असलेल्या बाभळगावात एक लहान तर दुसरा मोठा बिबट्या आढळून आला होता. यासंदर्भात ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.
![अन्नपाण्याच्या शोधात बिबट्या बाभळगाव शिवारात; वन विभागाकडून शोध सुरू leopard-in-babhalgaon-area-of-latur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7041766-462-7041766-1588494259344.jpg)
लातूर शहरापासून अवघ्या 6 किमी अंतरावर असलेल्या बाभळगावात एक लहान तर दुसरा मोठा बिबट्या आढळून आला होता. यासंदर्भात ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. अवघ्या काही वेळात दोन सापळे घेऊन अधिकारी-कर्मचारी बाभळगाव शिवारात दाखल झाले होते. सदरील उसाच्या फडात बिबट्यांच्या पायाचे ठसे आढळून आल्यानंतर दोन ठिकाणी सापळे लावण्यात आले आहेत. वनविभागाचे 15 अधिकारी-कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत. परंतु, दुपारी 12 पर्यंत या बिबट्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता.
अन्न व पाण्याच्या शोधात साई दुध डेअरी व भुसणी बॅरेजेस परिसरात एक लहान तर दुसरा मोठा बिबटा असल्याचे स्थानिक शेतकऱ्यानी सांगितले. मात्र, सध्या मशागतीची कामे सुरू असून यातच बिबट्या आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाचे अधिकारी गावच्या शिवारात तळ ठोकून आहेत.