लातूर- शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर लॉकडाऊन हा पर्याय नसून नियमांची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी व्यक्त केले होते. त्यानुसार सोमवारपासून चौकाचौकात दुचाकीसह इतर वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. या कारावाईत विनामास्क किंवा दुचाकीवरून दोघांनी प्रवास केल्यास 500 रुपयांचा दंड आकारला जात आहे.
लॉकडाऊनपेक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर भर; कारवाईसाठी जिल्हाधिकारी रस्त्यावर - लातूर कोरोना न्यूज
शहरातील गंजगोलाई, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नंदी स्टॉप याठिकाणी पोलीस कर्मचारी तसेच मनपाचे कर्मचारी तैनात आहेत. मास्क न घातल्यास किंवा दुचाकीवर एकापेक्षा जास्त व्यक्ती असल्यास 500 रुपये दंड आकारला जात आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्वतः गांधी चौकात वाहनधारकांवर कारवाई केली आहे
सद्यस्थितीला जिल्ह्यात 188 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हीच परिस्थिती लगतच्या जिल्ह्यातील असून बीड, परभणी या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लातूर शहरातही लॉकडाऊन करण्याची मागणी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केली होती. मात्र, लॉकडाऊन हा पर्याय नसून नियमांची अंमलबजावणी करून वाढत्या रुग्ण संख्येवर अंकुश घालणे आवश्यक आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले होते.
सोमवारपासून याची अंमलबजावणी केली जात असून शहरातील गंजगोलाई, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नंदी स्टॉप याठिकाणी पोलीस कर्मचारी तसेच मनपाचे कर्मचारी तैनात आहेत. मास्क न घातल्यास किंवा दुचाकीवर एकापेक्षा जास्त व्यक्ती असल्यास 500 रुपये दंड आकारला जात आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्वतः गांधी चौकात वाहनधारकांवर कारवाई केली आहे. सोमवारी या कडक अंमलबजावणीला सुरवात झाली असून सातत्य राहणेही तेवढेच गरजेचे आहे. शिवाय वयोवृद्ध नागरिकांनाही बाजारपेठेत फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.