महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ; उपाययोजना मात्र 'जैसे थे' - Latur corona active cases

मंदावलेली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या महिन्याभरापासून लातूर जिल्ह्यातील रुग्णांची आकडेवारी घटत होती. त्यामुळे दिलासादायक चित्र निर्माण झाले होते परंतु, गेल्या चार दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्या ही वाढू लागली आहे.

लातूर सरकारी रुग्णालय
लातूर सरकारी रुग्णालय

By

Published : Nov 25, 2020, 5:02 PM IST

Updated : Nov 25, 2020, 6:22 PM IST

लातूर- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी पुर्णपणे टळला नाही. नागरिकांनी सणासुदीत बाजारपेठेत केलेली गर्दी व तापसणीकडे दुर्लक्ष या कारणाने कोरोनाने रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. जिल्ह्यात 21 हजार 414 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 20 हजार 469 यांनी कोरोनावर मात केली आहे. तर 302 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात 11 कोरोनाचे सेंटर उभारण्यात आले होते. तर तालुक्याच्या ठिकाणी कोरोनाची सुविधा करण्यात आली होती. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस घट झाल्याने कोरोना सेंटरही बंद करण्यात आले होते. तर लातूर शहरात 7 ठिकाणी कोरोनाची चाचणी केली जात होती. सध्या, केवळ दोन ठिकाणी कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ

दिवाळीनंतर रुग्णांच्या संख्येत वाढ-

दिवाळीनंतर रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच 23 नोव्हेंबरपासून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्याने शिक्षकांना कोरोना चाचणीही बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळेच रुग्ण संख्या वाढली असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे. परंतु, सर्वसामान्य नागरिकांचेही अहवाल हे पॉझिटिव्ह आल्याने सतर्कता बाळगणे आवश्यक झाले आहे. सोमवारी 1 हजार 44 नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये 54 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. तर मंगळवारी 450 जणांची तपासणी केल्यानंतर 88 हे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे 643 व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे.

हेही वाचा-ईटीव्ही भारत विशेष : कोविड काळात सीपीआर रुग्णालयातील सुविधांमध्ये अनेक सुधारणा; झाले 'हे' महत्त्वाचे बदल

रुग्णसंख्या वाढली तरी उपाययोजना पूर्वीप्रमाणेच-
चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असले तरी चाचणीचे सेंटर आणि कोविड सेंटर हे पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. एकीकडे आरोग्य विभाग तपासणीचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पण, लातूर जिल्ह्यात त्या अनुषंगाने प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेतच कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.

हेही वाचा-महावितरणच्या दारात 'वंचित'चे चड्डी-बनियन आंदोलन


शिक्षकांच्या तापसणीमुळे वाढले रुग्ण- आरोग्य विभागाचा निर्वाळा
लातूर जिल्ह्यात 23 नोव्हेंबरपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना कोरोना चाचणी ही अनिवार्यच केली आहे. त्यामुळे ही संख्या वाढल्याचा निर्वाळा जिल्हा शल्यचिकित्सक एल. एस. देशमुख यांनी दिला आहे. परंतु, सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश या रुग्णांमध्ये आहे, हे ही तेवढेच खर आहे.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक येथे कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक नोंद-

भारतात मंगळवारी सायंकाळपर्यंत कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 91 लाख 77 हजार 841 वर पोहोचली आहे. तर 1 लाख 34 हजार 218 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील 86 लाख 4 हजार 955 रुग्ण आतापर्यंत कोरोनमुक्त झाले आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक येथे कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक नोंद झाली आहे.

Last Updated : Nov 25, 2020, 6:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details