लातूर - 12 परप्रांतीय व्यक्ती निलंग्यात दाखल झाले होते. त्यापैकी आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट निष्पन्न झाले होते. मात्र पुन्हा टेस्टनंतर 8 पैकी 7 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अखेर 14 दिवसांनंतर त्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर 8 पैकी 7 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 24 किंवा 48 तासानंतर या रुग्णांची आणखी एक टेस्ट होणार असून त्यानंतर अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना मूळ गावी पाठवण्यात येणार आहे.
लातूरची वाटचाल 'ग्रीनझोन'कडे... लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता!
12 परप्रांतीय व्यक्ती निलंग्यात दाखल झाले होते. त्यापैकी आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट निष्पन्न झाले होते. मात्र पुन्हा टेस्टनंतर 8 पैकी 7 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
या व्यक्तींनी हरियाणात धार्मिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यातील 12 व्यक्ती आंध्र प्रदेशातील करनुल जिल्ह्यात त्यांच्या मूळ गावी निघाले होते. 2 एप्रिलला त्यांना निलंग्यात अडकवण्यात आले. यावेळी त्यांनी धार्मिक स्थळी मुक्काम केला होता. मात्र, त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर 8 जणांना बाधा झाल्याचे समोर आले होते.
गेल्या 14 दिवसांपासून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. तसेच संबंधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले होते. नियमानुसार 14 दिवसानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यातील 8 पैकी 7 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर आता दुसऱ्या टेस्टमध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लवकरच त्यांना मूळगावी जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, शुक्रवारी आलेले रिपोर्ट लातूरकरांना दिलासा देणारे आहेत. या घटनेनंतर गेल्या 15 दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही.