लातूर -जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर गुरुची भूमिका महत्वाची आहे. योग्यवेळी योग्य मार्गदर्शन आणि त्यानुसार झालेली वाटचाल यामुळेच आज हे शक्य झाले आहे. ही सर्व भूमिका आई-वडील आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांमुळे निभावली असल्याचे मत लातूरचे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी गुरुपौर्णिमा दिनानिमित्त व्यक्त केले आहे.
तस्मै श्री गुरुवे नमः : 'आई-वडिलांच्या शिकवणीमुळे अंगिकारले नवनवे पैलू' - गुरुपौर्णिमेचे महत्त्व
आज गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त आम्ही तुमच्यासाठी 'तस्मै श्री गुरुवे नमः' ही सिरीज घेऊन आलो आहोत. त्याद्वारे लातूरचे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी गुरूबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तस्मै श्री गुरुवे नमः : 'आई-वडिलांच्या शिकवणीमुळे अंगिकारले नवनवे पैलू'
जीवनाच्या वळणावर आई-वडिलांनी केलेले संस्कार महत्वाचे ठरले आहेत. आई-वडील शेतकरी असून जीवनात सत्य आणि यश मिळविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न ही शिकवण लहान वयातच दिल्याने माझा जीवन जगण्याचा पाया मजबूत झाला. त्याला महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आकार दिला. त्यामुळे आई-वडील आणि प्राध्यापक यांच्या संस्कारामुळेच आज प्रगती होत असल्याचे जाधव यांनी सांगितले.