लातूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन गर्दी न करण्याचे आवाहन करत आहे. तरीही काही ठिकाणी लोक एकत्र जमत आहेत. अशाच एकत्र जमून पत्ते खेळणाऱ्यांचा डाव पोलिसांनी मोडला आहे. पोलिसांनी पाठलाग करुन 26 जणांना ताब्यात घेतले.
पत्त्यांचा रंगलेला डाव पोलिसांनी मोडला, 26 जणांना दाखवला खाकीचा दणका
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन गर्दी न करण्याचे आवाहन करत आहे. तरीही लोक गर्दी करताना दिसत आहेत. अशाच एकत्र जमून पत्ते खेळणाऱ्यांचा डाव पोलिसांनी मोडला. पोलिसांनी पाठलाग करुन 26 जणांना ताब्यात घेतले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, नागरिक पळवाट काढत नियमांचे उल्लंघन करताताना दिसत आहेत. असाच प्रकार लातूर लगतच्या कोळपा गावच्या शिवारात आढळून आला आहे. शेत शिवारात 40 ते 50 जण जुगार खेळत होते. गेल्या अनेक दिवसांपासून या नागिरीकांचे हे ठरलेलेच होते. शनिवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना याची माहिती मिळाली आणि या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस दिसताच पळता भुई थोडी अशी अवस्था या नागरिकांची झाली होती. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत काठीचा प्रसाद दिला. पोलिसांनी लाखोंच्या मुद्देमालासह 26 जणांना ताब्यात घेतले आहे. जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याने यांच्यावर लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.