महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Akash Hodade : लातूरचा कुख्यात गुंड आकाश होदाडे अखेर गजाआड, एमपीडीए कायद्यान्वये जिल्ह्यात पहिलीच कारवाई - लातूर इतिहासामधील एमपीडीएची पहिलीच कारवाई

धोकादायक गुंड आकाश होदाडे MPDA action On Danger Gangster Akash Hodade याच्या लातूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार Latur Police MPDA action कारवाई करण्यात आली आहे. एमपीडीए कायद्यानुसार केलेली ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई असल्याचा दावा पोलीस Latur Police MPDA Action On gangster Akash Hodade दलाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र आकाशच्या मुसक्या आवळल्यामुळे लातूरच्या गुन्हेगारीवर पोलीस अधिक्षक सोमय मुंडे Superintendent of Police Somay Munde यांनी लगाम घातला आहे.

MPDA On Akash Hodade
धोकादायक गुंड आकाश होदाडे

By

Published : Dec 24, 2022, 5:44 PM IST

लातूर -शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोपी असलेला धोकादायक गुंड आकाश होदाडे MPDA action On Danger Gangster Akash Hodade (वय 25 वर्षे ) याला लातूर जिल्हा पोलीस दलाने Latur Police MPDA action अखेर गजाआड केले आहे. आकाशवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून लातूर शहरासह जिल्ह्यामध्ये त्याची दहशत होती. त्यामुळे पोलीस दलाने Latur Police MPDA Action On gangster Akash Hodade त्याला स्थानबद्ध करून त्याची रवानगी जिल्हा कारागृहात केली आहे. सार्वजनिक शांततेस धोका असल्याने जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज Collector BP Prithviraj यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला. लातूर जिल्ह्याच्या इतिहासामधील एमपीडीएची ही पहिलीच कारवाई आहे.

सोमय मुंडे यांचा वाढत्या गुन्हेगारीला लगामवाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे Superintendent of Police Somay Munde यांच्या आदेशाने एमआयडीसी पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यांतर्गंत लातूर जिल्ह्यातील आकाश अण्णासाहेब होदाडे (वय 25 वर्ष, रा.कवठा ता. औसा. जि. लातूर) हल्ली मुक्काम न्यू भाग्यनगर, लातूर याच्याविरुद्ध कारवाई Latur Police MPDA Action On gangster Akash Hodade करण्यात आली आहे. एमपीडीए कायद्यांतर्गंत शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी लातूर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक Latur Police MPDA action कारवाई करण्यात येत आहे. पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीतील धोकादायक गुंड आकाशला 'एमपीडीए' कायद्याखाली Latur Police MPDA action एक वर्षासाठी स्थानबद्ध करुन त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

आकाशवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंदआकाशवर danger gangster Akash Hodade अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्यामध्ये खून, जीवे मारण्याचा प्रयत्न, कट रचून- भीती घालून खंडणी उकळणे, मालमत्तेचे नुकसान, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, दहशत निर्माण करुन मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशीर जमाव गोळा करुन दहशत करणे, असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्याकडून सार्वजनिक शांततेस धोका असल्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे Superintendent of Police Somay Munde यांचे निर्देशाने अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली गीते, पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे, अंमलदार विष्णू वायगावकर यांनी आरोपी आकाश विरुद्ध एमपीडीए Latur Police MPDA Action कायद्यानुसार प्रस्ताव तयार करून लातूरच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरी करिता पाठविला होता. तो जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी मंजूर केला आहे.

काय आहे एमपीडीए कायदा ?महाराष्ट्र झोपडपट्टीदादा Latur Police MPDA Action , हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम -1981 म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्‍या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details