लातूर - वातावरणातील बदल आणि साठवलेल्या पाण्यामुळे लातूर शहरासह जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुनिया यासह साथीच्या रोगांमध्ये वाढ झाली होती. यावर नियंत्रण करण्यासाठी पालिकेने 10 दिवसांची विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. दिवसाकाठी दोन प्रभागात ही स्वच्छता केली जात असून गेल्या सहा दिवसांपासून यामध्ये सातत्याने काम सुरू आहे. या मोहिमेमुळे साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यावर प्रशासनाला यश येत आहे.
साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी लातूर महापालिकेची स्वच्छता मोहीम हेही वाचा - पुन्हा निवडणूक..! नववर्षाच्या सुरुवातीलाच चित्रपटगृहात उडणार राजकारणाचा 'धुरळा', पाहा ट्रेलर
पालिकेअंतर्गत 18 प्रभाग असून विशेष स्वच्छता मोहीम 9 डिसेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. डेंग्यू आणि साथीच्या रोगाचे मूळ कारण काय? हे लक्षात आल्यानंतर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचाही समावेश आहे. ठरवून दिलेल्या प्रभागानुसार कर्मचारी सर्व साधनसामग्री घेऊन एकत्र येतात. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे प्रभात स्वछता केली जाते. गेल्या 5 दिवसांमध्ये 10 प्रभागातील स्वच्छता पुर्ण झाली आहे. याकरिता 160 कर्मचारी, 2 स्वच्छता निरीक्षक, 16 ट्रॅक्टर, औषध फवारणीसाठी 2 ट्रॅक्टर, 5 ग्रास कटर, 18 धूर फवारणी यंत्र वापरली जात आहेत.
महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि मनपा प्रशासन यांच्या कल्पनेतून ही मोहीम प्रत्यक्षात उतरली आहे. गेल्या 5 दिवसांमध्ये 10 प्रभाग स्वच्छ करण्यात आले आहेत तर उर्वरित 5 दिवसांमध्ये 8 प्रभागात ही मोहीम राबवली जाणार आहे. या दरम्यान होत असलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये समाधान असले तरी स्वच्छता मोहिमेत सातत्य ठेवण्याची अपेक्षा लातूरकर व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - मुंबई - कांद्याचे दर चढेच राहिले तर रेस्टॉरंटमधील मेन्यू महागणार; हॉटेल संघटनेची भूमिका