महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

....अखेर लातूर एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद - लातूर एमआयडीसी

लातूरच्या औद्योगिक भवनातील उद्योजकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. एमआयडीसीचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. मांजरा धरणात केवळ 4 दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पावसाअभावी कोरडी पडलेली विहीर

By

Published : Oct 2, 2019, 9:02 PM IST

लातूर -लातूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचे संकट महिन्याभरासाठी टळले आहे. मात्र, औद्योगिक भवनातील उद्योजकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. एमआयडीसीचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. मांजरा धरणात केवळ 4 दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

लातूर एमआयडीसीचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी घेतला

लातूर शहरासह औसा नागरीवस्ती आणि एमआयडीसीला मांजरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, धरणातील घटती पाणीपातळी पाहता मागच्या महिन्यातच एमआयडीसीचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी घेतला होता.

हेही वाचा - लातुरात भाजप घडवणार राजकीय भूकंप, काँग्रेसनिष्ठ चाकूरकरांच्या सुनबाईला देणार उमेदवारी?

पर्यायी व्यवस्था करूपर्यंत धरणातील पाणी सुरू ठेवण्याची विनंती उद्योजकांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एक महिन्याची मुदत दिली. सप्टेंबर महिन्यातही पाऊस न झाल्याने मांजरा धरणात केवळ 4 दलघमी पाणी शिल्लक राहिले आहे. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता हा पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.
लातूर जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे औद्योगिक भवनातील 700 युनिट क्षमतेवरील उद्योजकांवर संकट ओढवले आहे. समाधानकारक पाऊस होईपर्यंत हा पाणीपुरवठा बंदच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details