लातूर -लातूर लोकसभेची निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची तर भाजपासाठी प्रतिष्ठेची होत आहे. मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ नावालाच आहेत. त्यामुळे या दोन्ही मित्र पक्ष फारसा परिणाम पाडतील असे वाटत नाही. मात्र, यंदा नव्याने लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीमुळे मताच्या गोळाबेरजेवर परिणाम होणार हे नक्की. त्यामुळेच निकाल लागल्यानंतर क्रमांक एकचा उमेदवार आणि क्रमांक दोनच्या उमेदवारामध्ये अधिक मताचा फरक राहणार नाही, असे बोलले जात आहे.
सध्या निवडणुकांचे वारे जोमात वाहत असून काँग्रेसकडून मच्छिंद्र कामत, भाजपकडून सुधाकर श्रृंगारे तर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राम गारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 'दोघात तिसरा' या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे यंदाची निवडणुक चुरशीची होणार यामध्ये शंका नाही. २०१४च्या निवडणूकीत भाजपने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. त्यानंतर जिल्ह्यातल्या विधानसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंत भाजपने स्वतःचे वर्चस्व निर्माण केले. हा करिष्मा भाजपला विलासराव देशमुख यांचे २०१२ला झालेले निधन आणि २०१४च्या निवडणूकांमधील मोदींची लाटेच्या जोरावर करता आला.
यावेळची परिस्थिती वेगळी आहे. शृंगारे हे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या गोटातले आहेत. त्यामुळे ते उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासूनच प्रचाराच्या कामाला लागले आहे. निलंगेकर दररोज आढावा घेत आहेत. कोणी नाराज असेल तर त्यांची नाराजीही दूर करण्याचा प्रयत्नही त्यांनी सुरु केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात मात्र अजुनही मरगळ असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा मतदार संघा निहाय राजकीय पक्षांचे वर्चस्व -
जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदार संघाचा समावेश लोकसभा मतदार संघात आहे. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदार संघावर आजही देशमुखांची मजबूत पकड आहे. ग्रामीण भागात साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे संघटन तर शहरात दिवंगत विलासराव देशमुख यांचे वलय आजही कायम आहे. मात्र, इतर तीन मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचा उमेदवार विक्रमी मतांनी लोकसभेत दाखल झाला होता. त्यानंतर भाजपने महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीत वर्चस्व प्रस्थापित केले. असे असले तरीही ही निवडणूक भाजपसाठी सोपी नाही, कारण अंतर्गत गटबाजीमुळे उदगीर मतदार संघाचे आमदार सुधाकर भालेराव हे पालकमंत्र्यांच्या नेतृत्वावर नाराज आहेत. तर विद्यमान खासदारांना तिकीट डावल्याने ते ही या निवडणुकीपासून दूर आहेत. भाजपमध्ये तीन गट तयार झाले असून त्यांची मोट आवाळण्याचे आव्हान पक्षासमोर आहे.
सद्याची राजकीय परिस्थिती -
लातूर लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने जातीय समिकरणे महत्वपूर्ण ठरत आहेत. यातच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकाच समाजातील उमेदवराला तिकीट दिल्याने मत विभाजनाचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होणार असल्याचे बोलले जात आहे.
सध्या निवडणुकांचे वारे जोमात वाहत असून काँग्रेसकडून मच्छिंद्र कामत, भाजपकडून सुधाकर श्रृंगारे तर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राम गारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, या निवडणुकीच्या माध्यमातून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. तर काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या अपेक्षा अमित देशमुख यांच्याकडून वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या निकालावर या दोघांचेही भवितव्य अवलंबून असणार आहे.
मतदारांचे प्रश्न कायम -