लातूर - मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच लातूर लोकसभा मतदारसंघात आघाडीवर असलेले भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामांत हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते. भाजपने येथे आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सर्वकष प्रयत्न केले होते. तर गतवैभव मिळवण्यासाठी आमदार अमित देशमुख यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर केंद्रीय मंत्र्यांनीही या मतदारसंघात सभा घेतल्या. तर दुसरीकडे सचिन पायलट वगळता एकाही वरिष्ठ नेत्याने लातूर मतदार संघाकडे लक्ष केंद्रित दिले नाही. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून भाजप उमेदवार श्रृंगारे एकतर्फी आघाडीवर दिसून येत होते. तर दुसऱ्या स्थानासाठी काँग्रेस आणि वंचित आघाडीमध्ये संघर्ष दिसत होता.
वंचित बहुजन आघाडीचा परिणाम येथील लोकसभा निवडणुकांवर होणार असल्याचा अंदाज वर्तीवला जात होता. मात्र, सर्व शंका- कुशंका बाजूला सारत मताधिक्यात भाजप सातत्याने पुढेच जात आहे.
- महत्वाच्या घडामोडी -
- 02.25 PM -भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांना २ लाख ५ हजार १६१ मते मिळाली आहेत. कांग्रेसचे मच्छिंद्र कामांत यांना १ लाख १४ हजार ८४१ मते आणि वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर यांना ४० हजार ७५९मते.
- 01.45 PM -भाजपचे सुधाकर श्रृंगारे 86 हजार मतांनी आघाडीवर
- 10.30 am -भाजपचे सुधाकर श्रृंगारे २३ हजार ७१९ मतांनी आघाडीवर. श्रृंगारे यांना आतापर्यंत ४० हजार २१२ मते, कांग्रेसचे मच्छिंद्र कामांत यांना १६ हजार ४९३ मते तर बंचित बहुजन आघाडीचे राम गारकर यांना ५ हजार ५७४ मते मिळाली आहेत.
- 8.00 am -मतमोदणीला सुरुवात
- 8.29 am -भाजपने सुधाकर श्रृंगारे आघाडीवर