महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावकारी पाश : बियाणांच्या जागी शेतकऱ्याने स्वतःलाच घेतले गाडून! - Savkari Pash

लातूर तालुक्यातील रायवाडीच्या शिवाजी पवार यांनी खरिपाच्या पेरणीसाठी हात उसने पैसे घेतले होते. पेरणीसाठी त्यांनी आपल्या दावणीची म्हैस देखील विकली होती. मात्र, पाऊसच नाही तर पेरायचे कसे, दावणीला बांधलेल्या इतर जनावरांचा सांभाळ करायचा कसा? या विवंचनेतून शिवाजी पवार यांनी शेतातच विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.

latur farmer committed suicide another victim of savkari pash

By

Published : Aug 8, 2019, 11:24 AM IST

Updated : Aug 8, 2019, 11:47 AM IST

लातूर - "जीवघेणा दुष्काळ" हे आता म्हणण्यापुरते मर्यादित राहिले नाही. अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुष्काळ आणि वाढत्या सावकारी कर्जाचा भार यामुळे लातूर तालुक्यातील रायवाडीच्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.

सावकारी पाश : बियाणे जमिनीत न गाढता शेतकऱ्याने स्वतःलाच घेतले गाढून!

लातूर तालुक्यातील रायवाडीच्या शिवाजी पवार यांनी खरिपाच्या पेरणीसाठी हात उसने पैसे घेतले होते. पेरणीसाठी त्यांनी आपल्या दावणीची म्हैस देखील विकली होती. मात्र, पाऊसच नाही तर पेरायचे कसे, दावणीला बांधलेल्या इतर जनावरांचा सांभाळ करायचा कसा? या विवंचनेतून शिवाजी पवार यांनी शेतातच विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.

रायवाडी शिवारात पवार यांना केवळ 2 एकर जमीन तीही कोरडवाहू. शेती विकसित करण्यासाठी भांडवल म्हणून त्यांनी सिद्धेश्वर सहकारी बँकेचे 2 लाखाचे कर्ज घेतले होते. या कर्जातून शेती सुधारायची आणि मुलींचे लग्न करायचे हा त्यांचा विचार होता. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते. गेल्या 4 वर्षांपासूनची दुष्काळी स्थिती आणि लग्नाला आलेल्या मुली यामुळे शिवाजी पवार हे चिंतातूर होते. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येही त्यांनी मोठ्या मुलीचे लग्न केले. मात्र, दुष्काळ आणि नापिकी त्यांची पाठ सोडण्यास तयार नव्हती. तर दुसरीकडे बँकेने कर्ज फेडण्यासाठी लावलेला तगादा. यामुळे पवार यांनी 6 महिन्यांपूर्वी सावकाराकडून पैसे घेऊन बँकेचे पैसे भरले. मात्र, दुष्काळाची मालिका यंदाही कायम असल्याने दोन महिन्यापूर्वीच दावणीचे म्हैस विकून त्यांनी खरिपाच्या पेरणीची तयारी केली. याकरिता बियाणे आणि खताची थप्पीही घरी लावली. परंतु, पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी शेतात साधी ओलही नसल्याने पेरण्या रखडल्या तर इकडे सावकाराने पैशासाठी तगादा लावला. त्यामुळे उर्वरित मुलीचे लग्न करायचे कसे आणि संसाराचा गाडा हकायचा कसा या काळजीतून त्यांनी स्वतःच जीवन संपवले.

ज्या शेतात काबाडकष्ट करून आयुष्य काढले, त्याच शेतामध्ये त्यांनी विषारी द्रव प्राशन केले. बँकेच्या आणि सावकाराच्या कचाट्यातून शिवाजी पवार यांची सुटका झाली असली, तरी आता जगायचे कसे असा सवाल त्यांच्या पत्नी आणि मुलांसमोर आहे. दोन्ही मुलं ही मजूरीवर जात आहेत. तर गावकऱ्यांनी त्यांच्या जनावरांसाठी चारा दिला आहे. उसनवारीवर जीवन कसे कडेला जाईल. त्यामुळे सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा शिवाजी पवार यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे.

ज्या शेतीसाठी पवार यांनी जीवन अर्पित केले त्याच ठिकाणी आज महसुलाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. मात्र, प्रत्यक्ष मदतीपासून पवार कुटुंब अद्यापही वंचितच आहे. दुष्काळाने अनेक संकटे ओढवली मात्र, हा दुष्काळ शिवाजी पवार यांच्या जीवावर बेतलाय.

Last Updated : Aug 8, 2019, 11:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details