लातूर:आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावेळी लातूर विभागाचे विभागीय सहसचिव मारुती फडके यांनी सांगितले की, लातूर विभागीय शिक्षण मंडळात लातूर, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश होतो. लातूर विभागात लातूर जिल्हा निकालामध्ये अव्वल ठरला आहे. यावर्षी लातूर विभागातून एकूण १ लाख ५ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले. प्रत्यक्षात १ लाख ४ हजार ११५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात मुलांनी ८९.९९ टक्के तर मुलींची ९४.७१ टक्के यश संपादन केले. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. सन, २०२२ क्या निकालापेक्षा यंदा ४.६ टक्के निकाल कमी लागला आहे.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या: यंदाच्या दहावीच्या निकालात लातूर विभाग राज्यात सातव्या क्रमांकावर आहे. विभागात एकून १ लाख ४ हजार ५८२ मुले तर १ लाख २ हजार ८८२ मुलींनी परीक्षा दिली. यामध्ये मुलांपेक्षा ४.३८ टक्के मुलींची परीक्षा उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे. लातूर विभागीय मंडळातील नांदेड जिल्हा ९०.३९ टक्के, धाराशिव ९३.५० तर लातूर ९४.८८ टक्के निकाल लागला असून लातूर विभागात लातूर जिल्हा निकालात प्रथम क्रमांकावर आहे.
आज दहावीचा निकाल जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेत लातूर जिल्ह्यातील ९४.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.निकालात लातूर विभागाचा एकूण निकाल ९२.१६ टक्के इतका लागला आहे. लातूरचा निकाल ९४.८८ टक्के लागला असून, लातूर विभागात लातूर जिल्हा निकालात प्रथम क्रमांकावर आहे. -सहसचिव मारुती फडके