महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूरकरांना किंचित दिलासा; आता १० दिवसाला होणार पाणीपुरवठा - लातूरकरांना किंचीत दिलासा

परतीच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले असले तरी पिण्याचे पाण्याचे मात्र संकट दूर केले आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात तब्बल ४० दलघमी पाणीसाठा झाला असल्याने आता १५ दिवसातून एकदा होणारा पाणीपुरवठा १० दिवसावर आला आहे.

लातूरकरांना किंचीत दिलासा; आता १० दिवसाला होणार पाणीपुरवठा

By

Published : Nov 6, 2019, 7:08 PM IST

लातूर -परतीच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले असले तरी पिण्याचे पाण्याचे मात्र संकट दूर केले आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात तब्बल ४० दलघमी पाणीसाठा झाला असल्याने आता १५ दिवसातून एकदा होणारा पाणीपुरवठा १० दिवसावर आला आहे. शिवाय भविष्यातील पाणीटंचाईचे संकटही दूर झाले आहे.

१० दिवसाला होणार पाणीपुरवठा

हेही वाचा - स्वच्छ शहर स्पर्धेतून पुणे बाहेर फेकले जाणार...'केंद्रीय पथकाकडून स्टार रेटींग नाही'

भर पावसाळ्यात लातूर शहरासह इतर शहरांना पाणीपुरवठा करणारे मांजरा धारण हे तळाला गेले होते. केवळ ४.५ दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे शहरातील नागरिकांना १० दिवसातून होणारा पाणीपुरवठा १५ दिवसावर गेला होता. शिवाय औद्योगिक भवन परिसरातील पाणीपुरवठाही खंडित करण्यात आला होता. भविष्यात नागरिकांना पाणीपुरवठा करायाचा कसा असा सवाल जिल्हा प्रशासनासमोर होता. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून परतीच्या पावसाने लातूर जिल्ह्यासह मांजरा धारण क्षेत्रात हजेरी लावल्याने चित्र बदलेले आहे.

कोरडी असलेली मांजरा नदी आता खळखळून वाहत आहे. तर दिवसाकाठी १ ते २ दलघमी पाण्याची वाढ धरणात होत आहे. सध्या मांजरा धरणात ४४ दलघमी पाणीसाठा झाला असून आवक सुरूच आहे. आवक वाढल्याने दररोज ६ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करणे शक्य झाल्याने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - राजधानीमधील शाळा पुन्हा झाल्या सुरू.., मात्र हवेचा स्तर खालावलेलाच

ABOUT THE AUTHOR

...view details