महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विलासराव देशमुखांचे दोन्ही चिरंजीव विधानसभेच्या आखाड्यात

जिल्ह्यातील औसा, लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या 3 मतदारसंघातील उमेदवारांची नावे काँग्रेसने जाहीर केली आहेत. त्यानुसार लातूर शहरमधून अमित देशमुख, तर औसा मतदार संघातून बसवराज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसने दिवंगत विलासराव देशमुखांचे कनिष्ठ चिरंजीव धीरज देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

विलासराव देशमुखांचे दोन्ही चिरंजीव विधानसभेच्या आखाड्यात

By

Published : Sep 20, 2019, 5:11 PM IST

लातूर - जिल्ह्यातील औसा, लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या 3 मतदारसंघातील उमेदवारांची नावे काँग्रेसने जाहीर केली आहेत. त्यानुसार लातूर शहरमधून अमित देशमुख, तर औसा मतदार संघातून बसवराज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसने दिवंगत विलासराव देशमुखांचे कनिष्ठ चिरंजीव धीरज देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

लातूर ग्रामिणचे विद्यमान आमदार त्र्यंबक भिसेंना उमेदावरी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागी जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. घराणेशाहीला विरोध म्हणून धीरज देशमुख यांच्या नावाचा उल्लेख टाळला जातो की काय, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते जि.प. सदस्य या कालावधीतच धीरज देशमुख यांनी लातूर ग्रामीणमधून तयारी सुरू केली होती. मांजरा, रेणा आणि विकास या तीनही कारखान्यांचा या मतदारसंघात समावेश आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रावरील त्यांची पकड मजबुत असल्याने त्यांना त्याचा फायदा होईल. गतवेळी दिलीप देशमुखांचे समर्थक त्र्यंबक भिसे यांना संधी देण्यात आली होती. मात्र, गेल्या 3 वर्षांपासून कार्यकर्त्यांच्या बैठका आणि जनसंपर्क धीरज देशमुख यांनी वाढवला आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आता लातूर शहरातून अमित देशमुख तर ग्रामीणमधून धीरज देशमुख आपले नशीब आजमावणार असल्याने संपुर्ण राज्याचे लक्ष लातुरकडे असणार आहे. औसा मतदार संघातून बसवराज पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. धीरज देशमुख यांचे नाव जाहीर होताच शहरात फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आले.

ABOUT THE AUTHOR

...view details