लातूर - जिल्ह्यात 'आम्ही लातूरकर' या मोहिमेच्या माध्यमातून गेल्या 21 दिवसांपासून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा केली जात आहे. लातूर शहरातील व्यापाऱ्यांकडूनही पूरग्रस्तांना मदत म्हणून संसारपयोगी साहित्यांची मदत गोळा करण्यात आली आहे, ही मदत लवकरात लवकर पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात येणार आहे.
लातूरच्या व्यापारी वर्गाकडून पूरग्रस्तांना संसारपयोगी साहित्यांची मदत - लातूर news
पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती नियंत्रणात आली असली, तरीही तेथील जीवनमान सुरळीत होण्यासाठी मदतीची गरज आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातून 'आम्ही लातूरकर' अशी मोहीम राबवली जात आहे. लातूर शहरामधील किराणा होलसेल व्यापाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी दैनंदिन जीवनात लागणाऱ्या २७ वस्तू ५०० कुटुंबियांना मिळतील इतकी मदत गोळा केली आहे
लातूरमध्ये 'आम्ही लातूरकर'च्या माध्यमातून गेल्या 21 दिवसांपासून मदतीचा ओघ कायम आहे. प्रशासकीय मदतीबरोबरच आता मदतीसाठी येथील किराणा होलसेल व्यापाऱ्यांनीही पुढाकार घेतला आहे. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या २७ वस्तू ५०० कुटुंबियांना मिळतील अशा प्रकारे मदतीचा हात देण्यात आला आहे.
यापूर्वी विविध संघटना आणि प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मदत करण्यात आली आहे. यानंतर आता किराणा होलसेल व्यापाऱ्यांनी एकत्र येत वेगवेगळ्या प्रकारच्या २७ वस्तू जमा करून प्रत्यक्ष पुरग्रस्तांच्या दारात जाऊन मदत देण्याचा निर्धार केला आहे. नेमक्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, याची खातरजमा करून हा मदतीचा हात पुढे केले असल्याचे किराणा होलसेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बसवराज वाळसांग यांनी सांगितले आहे.