महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपचे कार्यकर्ते आंदोलनासाठी एकवटले अन् चहा-पान करून परतले - राफेल

राफेल विमान खरेदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोटे आरोप केल्या प्रकरणी राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी याकरिता गांधी चौक लातूर येथे भाजपचे आंदोलन नियोजित होते. मात्र राम मंदिराच्या निकालापासून जिल्ह्यात लागू असलेली जमावबंदीमुळे भाजप कार्यकर्त्यांना आंदोलन करता आले अद्यापही कायम आहे

भाजपचे कार्यकर्ते आंदोलनासाठी एकवटले अन् चहा-पान करून परतले

By

Published : Nov 16, 2019, 3:26 PM IST

लातूर -गेली पाच वर्षे सत्तेत असणाऱ्या भाजपकडून शनिवारी बऱ्याच अवधी नंतर आंदोलन करण्यात येणार होते. राफेल विमान खरेदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोटे आरोप केल्या प्रकरणी राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी याकरिता गांधी चौकात भाजपचे आंदोलन नियोजित होते. त्या अनुषंगाने मनपाचे नगरसेवक, पदाधिकारीही एकवटले. मात्र, ऐनवेळी जमावबंदी लागू असल्याने पोलिसांनी त्यांना आंदोलन करण्यापासून रोखले. मग काय जमा झालेल्या पदाधिकाऱ्यांतील चहा-पान करून आंदोलनाच्या ठिकाणाहून काढता पाय घेत सर्वांनी जिल्हाअधिकारी कार्यालय गाठले.

भाजपचे कार्यकर्ते आंदोलनासाठी एकवटले अन् चहा-पान करून परतले

हेही वाचा - 'कोणत्याही कंपनीचे कामकाज बंद पडू नये, अशी माझी इच्छा आहे'

राफेल विमान खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला होता. शिवाय या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणीही केली होती. सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान खरेदीमध्ये कोणताही अपहार झाला नसल्याचे सांगितले आहे. राहुल गांधी यांची मागणी फेटाळून लावली आहे. देशाच्या संरक्षण विषयक संदर्भात भ्रष्टाचाराचा खोटा आरोप केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी सर्व देशवासियांची माफी मागावी या मागणीसाठी सर्व पदाधिकारी एकवटले होते.

राम मंदिराच्या निकालापासून जिल्ह्यात लागू असलेली जमावबंदी अद्यापही कायम आहे. मात्र, याचा विसर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पडला आणि सर्वजण गांधी चौकात आंदोलनासाठी एकवटले. पोलिसांनी विरोध कार्यकर्त्यांनी केवळ निवदेन लिहून थेट जिल्हाअधिकारी कार्यालय गाठले.

हेही वाचा - सत्ता स्थापनेविषयी शरद पवारांचा मोठा खुलासा; वक्तव्यामुळे संभ्रम

ABOUT THE AUTHOR

...view details