लातूर - वाढत्या उन्हाबरोबर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळाही तीव्र जाणवू लागल्या आहेत. गेल्या महिन्याभरात टँकरची संख्या ३ वरून थेट ३३ वर गेली असून ५४१ गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणूव लागली आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या उद्देशाने ४५५ अधिग्रहणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. शहरात मात्र १० दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.
गतवर्षी सरासरीपेक्षा ६० टक्के एवढाच पाऊस झाल्याने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या टप्प्यातच पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. गावस्तरावरील प्रकल्पांनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांचीही दाहीदिशा भटकंती होत आहे. जिल्ह्यात ४२९ गावे आणि ११२ वाड्यांवर पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर ५४१ गावातून तब्बल ८०० अधिग्रहाणाच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे.