लातुर- जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील आनंदवाडी गावाला पीक विम्याच्या लाभापासून वगळल्यामुळे ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे दुपारपर्यंत मतदानच झाले नव्हते.
'या' कारणामुळे लातूरच्या आनंदवाडीत रात्री उशिराही मतदान सुरुच.. - anandvadi
पीक विम्याच्या लाभापासून वगळल्यामुळे ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला होता. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ग्रामस्थांशी फोनवरुन संपर्क साधला. त्यानंतर ग्रामस्थानी उशिरा मतदानाला सहमती दर्शवली.
!['या' कारणामुळे लातूरच्या आनंदवाडीत रात्री उशिराही मतदान सुरुच..](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3045014-thumbnail-3x2-latur.jpg)
यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ग्रामस्थांशी फोनवरुन संपर्क साधला. त्यानंतर ग्रामस्थानी उशिरा मतदानाला सहमती दर्शवली.
त्यानंतर रांगा लावून मतदान सुरू झाले. दुपारपर्यंत गावात एकही मतदान झाले नव्हते. मात्र, रात्री उशिरा मतदानाला सुरूवात झाल्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत ५५० मतदारांनी हक्क बजावला. त्यांनतरही बराच वेळ मतदानाची प्रक्रिया सुरूच ठेवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाचे कर्मचारीही केंद्रावर उपस्थित होते.