महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूरच्या इतिहासातील काळा दिवस, किल्लारी भूकंपाला २६ वर्षे पूर्ण - किल्लारी भूकंपाला २६ वर्ष

मंगळवारी किल्लारी भूकंपाला २६ वर्ष पूर्ण झाली. भूकंपात मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

किल्लारीच्या भूकंपाला २६ वर्ष पूर्ण

By

Published : Oct 1, 2019, 2:25 PM IST

लातूर -२६ वर्षांपूर्वी याच दिवशी किल्लारीसह परिसरातील ५२ गावचे ग्रामस्थ गाढ झोपेत असताना तीव्र भूकंपाचे धक्के बसले होते. २६ वर्षानंतर येथील ग्रामस्थ पूर्वपदावर आले असले तरी त्या जखमा आजही कायम आहेत. कारण ६.४ रिश्टर स्केलच्या या भूकंपात तब्बल १२ हजार जणांना जीवाशी मुकावे लागले होते. अनेकजण गंभीर जखमी झाले होते. गतवर्षी २५ वर्ष पूर्ण झाली होती तेव्हा राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला होता. मात्र, मंगळवारी शासकीय कार्यक्रम झाला. यावेली मत्युमुखी पडलेल्यांना मानवंदना देण्यात आली.

किल्लारीच्या भूकंपाला २६ वर्ष पूर्ण

हेही वाचा - भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी ; अहमदपूरच्या पंचायत समिती सभापतींचा राजीनामा

गेल्या २६ वर्षापसून ३० सप्टेंबर हा काळा दिवस मानला जातो. या दिवशी शाळा, शेतीची कामे आणि गावातील बाजारपेठही बंद ठेवली जाते. किल्लारी गाव तर जमीनदोस्तच झाले होते. त्यांनतर या गावासह परिसरातील अनेक गावांचे पुंनर्वसन करण्यात आले होते. मात्र, आजही काही गावांमध्ये अंतर्गत रस्ते, पाईपलाईन, नाली बांधकाम, आरोग्य यासारख्या समस्या कायम आहेत. या दिवशी मात्र, भूकंपात मरण पावलेल्या व्यक्तींसाठी शोक व्यक्त करून हुतात्मा स्तंभास मानवंदना देण्यात आली. याच परिसरात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नावे एक वृक्ष लावण्याचा निर्धार प्रशासनाने केला होता. शिवाय याचे काम वनविभागाकडेही देण्यात आले होते. याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. मंगळवारी औसा येथील तहसीलदार शोभा पुजारी, नायब तहसीलदार वृषाली केसकर, अरविंद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मानवंदना देण्यात आली.

हेही वाचा - महाराष्ट्र बोलतोय : लातूरमध्ये शेतकऱ्यांमध्ये कहीं खुशी... कहीं गम... पाणीप्रश्न मात्र कायम

ABOUT THE AUTHOR

...view details