महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औसामध्ये किर्तनकाराचे अपहरण; अपक्ष उमेदवार जाधवांसह अरविंद पाटील यांच्यावर गुन्हा दाखल - candidate jadhav and aravind patil

विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना किशोर जाधव नावाचे किर्तनकार हे विरोधकांचा प्रचार करीत असल्याच्या कारणावरुन त्यांचे अपहरण आणि मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. यावरुन अपक्ष उमेदवार बजरंग जाधव व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील यांच्यावर औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बजरंग जाधव, अरविंद पाटील

By

Published : Oct 20, 2019, 11:51 PM IST

लातूर -विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना किशोर जाधव नावाचे किर्तनकार हे विरोधकांचा प्रचार करीत असल्याच्या कारणावरुन त्यांचे अपहरण आणि मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. यावरुन अपक्ष उमेदवार बजरंग जाधव व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील यांच्यावर औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट

किशोर धोंडीराम जाधव (रा. शिवणी ता. औसा) हे कीर्तन, प्रवचन आणि शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी फेसबुकवर भाजपचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्याबाबत पोस्टही टाकली होती. मात्र, त्यांचा प्रचार का करतोस म्हणून त्यांना बळवंत लातूरकर आणि कुलदीप जाधव यांनी चारचाकी कारमध्ये बसवून निलंगा येथे अपक्ष उमेदवार बजरंग जाधव व अरविंद पाटील यांच्याकडे घेऊन गेले होते. दरम्यान, आजपासून विरोधकाचा प्रचार करायचा नाही म्हणून या दोघांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शिवाय बळजबरीने प्रचार करण्यास भाग पाडले असल्याचेही सांगण्यात आले आहे. यावरून औसा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर निवडणुकांच्या तोंडावर आमच्यावर षडयंत्र रचण्यात आले असल्याची प्रतिक्रिया बजरंग जाधव यांनी दिली आहे.

हेही वाचा - पाकिस्तानच्या गोळीबारात 2 जवान हुतात्मा; प्रतिहल्ल्यात निलम खोऱ्यात ४ जणांचा खात्मा

ABOUT THE AUTHOR

...view details