महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकाराच्या 'त्या' चिठ्ठीमुळे खासगी रुग्णालयातील उपचाराबाबत प्रश्नचिन्ह - लातूर जिल्हा कोरोना बातमी

लातूर जिल्ह्यात सध्या ६८३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता खासगी रुग्णालयेही ताब्यात घेण्यात आली आहेत. मात्र, येथील उपचाराबद्दल एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या आणि गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत.

journalist died due to corona in latur
कोविड रुग्णालय लातूर

By

Published : Jul 31, 2020, 3:56 AM IST

लातूर - जिल्ह्यात सध्या ६८३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता खासगी रुग्णालयेही ताब्यात घेण्यात आली आहेत. मात्र, येथील उपचाराबद्दल एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या आणि गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. खासगी रुग्णालयात २० ते ७५ हजार रुपये डिपॉझिट द्यावे लागेल म्हणून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाल्याची चिठ्ठी मृत्यू झालेल्या ज्येष्ठ पत्रकारानेच लिहिली होती. त्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल व्हावे की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दररोज ३६५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र, शासकीय रुग्णालयात जागा कमी पडत असल्याने शहरातील १३ खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यात आली आहेत. या खासगी रुग्णालयांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन शासनाने दिले होते. असे असतानाही खासगी रुग्णालयात योग्य उपचार होत नाहीत. तसेच या ठिकाणी अनामत रक्कम भरावी लागत असल्याचे एकाच दिवशी दोन प्रकार समोर आले आहेत.

लातुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकाराच्या चिठ्ठीमुळे खासगी रुग्णालयातील उपचाराबाबत प्रश्नचिन्ह

हेही वाचा -पोलीस दलातील जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू

एका ६० वर्षीय महिलेवर शहरातील अल्फा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. परंतू, नेमके काय झाले, याची माहिती वेळेत महिलेच्या नातेवाईकांना देण्यात आली नसल्याचा आरोप महिलेच्या मुलाने केला होता. शिवाय उपचारादरम्यान महिलेचा मृत्यूही झाला. त्यामुळे सदरील महिलेच्या मोठ्या मुलाने या रुग्णालयातील डॉ. दिनेश वर्मा यांच्यावर हल्ला केला होता. शिवाय पैशाची मागणी केली असल्याचा आरोपही यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी केला होता.

पत्रकाराने लिहिलेली चिठ्ठी...

वरील घटना बुधवारी सकाळी घडली तर त्याच दिवशी मध्यरात्री एका ज्येष्ठ पत्रकाराचा कोरोनाने मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्यांनी लिहलेली चिठ्ठी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. "माझा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे...शासकीय रुग्णालयात दाखल झालो आहे....आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमधून बरा होईल एवढा विश्वास आहे...पण मधुमेह आणि हृदयरोग यामुळे चिंता वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले होते...पण टीप म्हणून लिहलेल्या तीन ओळी महत्वाच्या होत्या...खाजगी रुग्णालयातील डिपॉझिट २० ते ७५ हजार आणि दिवसाकाठी पाच हजार रुपये मला परवडत नाही. म्हणून उपरोक्त निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे" त्यामुळे खासगी रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांनी उपचार घ्यावे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा -'कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिकांमधील दुवा म्हणून भूमिका बजावावी'

एकीकडे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणेच बिलाची आकारणी करण्यात यावी, असे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. तर मग या अनामत रकमेची आणि अतिरीक्त बिलाचा बोजा कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. आता खासगी रुग्णालयासमोर दरपत्रक लावले जाणार असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले आहे. पण, मागच्या दोन प्रकारामुळे आता सर्वसामान्य रुग्ण खासगी रुग्णालयाची पायरी चढतील की नाही, याबाबत शंका आहे. पत्रकाराच्या निधनाबद्दल पालकमंत्री अमित देशमुख यांनी दुःख व्यक्त केले, परंतु खासगी रुग्णालयातील प्रकारबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details