महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मी पुन्हा येईन', असे वाक्य विचार करून वापरावी लागणार; जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला - जयंत पाटील लातूर प्रचार न्यूज

चार दिवसांपूर्वी खासदार रावसाहेब दानवे यांनी हे सरकार दोन महिन्यात पडेल असे भाकीत केले होते. दानवे यांना असे का वाटते याचा खरपूस समाचार महाविकास आघाडीचे नेते जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला.

व्यासपीठावर महाविकास आघाडीचे नेते
व्यासपीठावर महाविकास आघाडीचे नेते

By

Published : Nov 26, 2020, 10:04 PM IST

Updated : Nov 26, 2020, 10:28 PM IST

लातूर - 'मी पुन्हा येईन' म्हणाले, तर लोक हसतात. त्यावर आता असे वाक्य विचार करून वापरावी लागणार असल्याचा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. सर्वांना दूर ठेऊन मीच पुन्हा येणार हे शक्य नसते, असेही पाटील यांनी यावेळी म्हटले. मराठवाडा पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचार मेळावात जलसंपदा मंत्री बोलत होते.

रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकार हे दोन महिन्यात पडेल असे भाकीत नुकतेच केले होते. त्यावर जयंत पाटील म्हणाले, की निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून अनेक नेते हे भाजपात गेले आहेत. त्यांना रोखून धरण्यासाठी सत्ता येणार असल्याच्या भाजपला अफवा सोडव्या लागतात. अन्यथा नेते परत जातील ही भीती भाजपमध्ये आहे, असे म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांना टोला लगावला. लातूर, उस्मानाबाद, बीड येथील पाणी पुरवठ्यासाठी मोठी योजना आखण्यात आलेली आहे. पण आचारसंहिता असल्याने त्याची घोषणा करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय टोलेबाजी

हेही वाचा-इंडियन आयडॉल 12 : जळगावच्या युवराजचा सेटवर झाडू मारण्यापासून स्पर्धक बनण्यापर्यंतचा प्रवास

दानवेंना दोनशे वर्षे म्हणायचे असेल-

पदवीधर निवडणुकीत पाचही जागांवर भाजपने वर्चस्व निर्माण केले तर जनतेचा कौल कुणीकडे आहे हे लक्षात येईल. तसेच सरकार कोसळेल असे रावसाहेब दानवेंनी म्हटले होते. यावरून अब्दुल सत्तार म्हणाले, की दानवेंना दोनशे वर्ष म्हणायचे असेल. पुढे ते म्हणाले, की केवळ माझ्या आणि अर्जुन खोतकर यांच्या चुकीमुळेच ते आज खासदार झाले आहेत. दानवे आणि दानत यामध्ये फरक असतो. नेमका तोच फरक ओळखण्यात गल्लत झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा-...ही तर अपयशाचीच वर्षपूर्ती - रामदास आठवले

महाविकास आघाडी म्हणजे घड्याळ घातलेला आणि हातामध्ये धनुष्यबाण-

महाविकास आघाडी म्हणजे घड्याळ घातलेला आणि हातामध्ये धनुष्यबाण असे समीकरण झाले आहे. त्यामुळे सरकार पडेल असा पाच वर्षे करू नये, असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले. अतिआत्मविश्वासमुळे सत्ता गेली असल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पुढे अमित देशमुख म्हणाले, की व्यासपीठावर जयंत पाटील हे मध्ये बसले होते. तर एकीकडे अब्दुल सत्तार आणि मी बसलो होतो. जयंत पाटील यांनी दोघांचेही धरले आहेत. तर सरकार कसे पडणार असा सूचक प्रश्न त्यांनी विचारला.

भाजपमध्ये माझे वाळवण झाले : जयसिंग गायकवाड
चार दिवसांपूर्वीच भाजपात असलेले जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या प्रचारालाही त्यांनी सुरवात केली आहे. पक्षांतर का केले याचे कारण एक-दोन वाक्यात सांगायचे झाले तर माझी भाजपात बोळवण झाली आहे. मात्र, पूर्वीप्रमाणेच पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

एकंदरीत मेळावा हा पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने असला तरी राजकीय टोलेबाजीने गाजला.

Last Updated : Nov 26, 2020, 10:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details