लातूर- कोरोना विषाणूचा विळखा देशात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रविवारी 22 मार्चला जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागरिकांनी कर्फ्यूचे पालन करून घरातच बसावे, असे आवाहन केले आहे. ते आवाहन जिल्ह्यातील ग्रामीण भागात दवंडीच्या माध्यमातून पोहचवले जात आहे.
video: पाहा लातुरातील 'जनता कर्फ्यू'ची दवंडी... - लातूर कोरोना बातमी
निलंगा शहरातील व्यापाऱ्यांनी शनिवारीच सर्व दुकाने बंद ठेवून शंभर टक्के बंद पाळला आहे. तसेच एसटी बस सुध्दा दुपारपासून बंद ठेवण्यात आल्या आहते. माकणी थोर येथील जागृत हनुमान देवस्थानाकडे शनिवारी शेकडो भाविक येतात. मात्र, आज येथे कोणीही आल्याचे आढळले नाही. मंदिर परिसरात शुकशुकाट होता.
पाहा लातुरातील 'जनता कर्फ्यू'ची दवंडी...
हेही वाचा-कोरोना परिणाम : दुकाने, मॉल बंद झाल्याने ऑनलाईन खरेदीचे वाढले प्रमाण
निलंगा शहरातील व्यापाऱ्यांनी शनिवारीच सर्व दुकाने बंद ठेवून शंभर टक्के बंद पाळला आहे. तसेच एसटी बसही दुपारपासून बंद ठेवण्यात आल्या आहते. माकणी थोर येथील जागृत हनुमान देवस्थानाकडे शनिवारी हजारो भाविक येत असतात. मात्र, आज येथे कोणीही आल्याचे आढळले नाही. मंदिर परिसरात शुकशुकाट होता.