लातूर- गेल्या महिनाभरापासून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जिल्ह्यात अनेक आंदोलन, मोर्चे काढले जात आहेत. शुक्रवारी (दि. 3 जाने.) उदगीरमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात आले. हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
सी.ए.ए. आणि एन.आर.सी.मुळे देशातील नागरिकांवर अन्याय होणार असल्याचे म्हणत याला विरोध करीत हे जेलभरो आंदोलन करण्यात आले. नागरिकत्व विधेयक मंजूर झाले असले तरी या विधेयकाला मुस्लीम समाजासाह अनेक घटकांमधून विरोध केला जात आहे. या विधेयकामुळे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातील अल्पसंख्याक या समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. या कायद्यानुसार भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी 11 वर्षे भारतामध्ये वास्तव्य करणे आवश्यक राहणार आहे. तर शेजारच्या देशांमधून अल्पसंख्याक समुदायासाठी ही अट 6 वर्षे करण्यात आली आहे.