लातूर - रेणापूर तालुक्यातील खरोळ गाव गेल्या दहा दिवसातील दोन घटनांनी हादरून गेले आहे. आतापर्यंत दोघांनी आत्महत्या केल्या आहेत तर सोमवारी गावालगतच्या कोरड्या विहिरीत एका ३० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमागचे कारण काय? याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर अव्हान आहे.
खरोळा गावालगत असलेल्या एका कोरड्या विहिरीत लखन राऊतराव या व्यक्तीचा मृतदेह पोत्यामध्ये हात-पाय बांधून पडलेल्या अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे लखन राऊतराव याच्या पत्नीने गळफास घेऊन दहा दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. पत्नी मनिषाच्या आत्महत्येनंतर लखन याच्यासह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून लखन हा गावात नव्हता तर मनिषाचे सासू-सासरे व इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.