महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 26, 2020, 1:13 PM IST

ETV Bharat / state

अवयव दान केलेल्या तरुणाच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती, मदतीचे आवाहन

औसा तालुक्यातील मोगरगा येथे घरातील कर्ता पुरुष असलेल्या राजेश रुबदे यांचा मृत्यु झाल्यावर त्यांचे सहा अवयव दान केले आहेत. आमदार अभिमन्यू पवार यांनी परिवाराला याबाबत माहिती दिली. मात्र रूबदे यांच्या कुटुंबात चार मुली असून घरची परस्थिती बेताची आहे. त्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे. त्यांना सरकारने किंवा सामाजिक संस्थांनी मदत करण्याचे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांना केले आहे.

rajesh rubade organ donation news
औसा राजेश रुबदे अवयव दान

लातूर - अवयव दानाबाबत पाहिजे तशी जनजागृती होत नाही. तरीही औसा तालुक्यातील मोगरगा सारख्या खेडेगावातील रुबदे कुटुंबीयांनी कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. घरातील कर्ता पुरुष असलेल्या राजेश रुबदे यांचा एका अपघातामध्ये ब्रेनडेड झाला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत रूबदे कुटुंबातील सदस्यांनी राजेश यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सहा जणांना जीवदान मिळणार आहे. त्यांच्या हृदयामुळे अहमदनगर येथील एका महिलेला जीवनदान मिळाले आहे.

औसा राजेश रुबदे अवयव दान

सहा अवयव केले दान
औसा तालुक्यातील मोगरगा येथील राजेश महादेव रुबदे हे पत्नी आणि चार मुलींसमवेत पुण्यात राहात होते. ते रिक्षा चालवत होते. लॉकडाऊन काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एके दिवशी रात्री घरी पाणी घेऊन जाताना अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये राजेश यांचा ब्रेनडेड झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही मृत्यूला रोखता येणार नव्हते. याची माहिती डॉक्टर यांनी राजेश यांच्या कुटुंबियांना दिली. किमान त्यांचा जीव वाचला नाही तरी त्यांच्या अवयवातून ते कायम सोबत राहतील असा विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांना दिला. त्यानुसार मृत्यू झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत त्यांचे हृदय, यकृत, किडनी असे अवयव दान करण्यात आले. त्यामुळे मृत्यूनंतर राजेश रूबदे हे आपल्याच आहेत अशी कुटुंबियांची भावना झाली आहे.

सरकार आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक
एका सर्वसामान्य रुबदे कुटुंबीयांनी अवयव दानाचा निर्णय घेतला होता. यामुळे त्यांचा निर्णय कौतुकास्पद आहे. पण राजेश रूबदे यांच्या घरची परस्थिती बेताची आहे. त्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे. राजेश यांना चार मुली आहेत. त्यानुसार सरकारने आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -अहमद पटेल यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार; राहुल गांधींनी घेतले अंत्यदर्शन

ABOUT THE AUTHOR

...view details