मुंबई -डॉक्टरांवरील हल्ल्याची मालिका कोरोना महामारीतही अखंड सुरू आहे. त्यानुसार नुकताच लातूरमध्ये एका डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याचा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्रने निषेध केला आहे. तर जिवाची पर्वा न करता कोरोनाशी दोन हात करत अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या डॉक्टरांना कोरोना काळातही लक्ष्य केले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तर अशा घटनांना आळा घालण्यासाठी दोषींविरोधात कडक कारवाईची मागणी आयएमएने केली आहे.
लातूरमधील डॉक्टरवरील हल्ल्याचा आयएमएकडून निषेध, कडक कारवाईची मागणी - लातूर लेटेस्ट अपडेट
डॉक्टरांवरील हल्ल्याची मालिका कोरोना महामारीतही अखंड सुरू आहे. त्यानुसार नुकताच लातूरमध्ये एका डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याचा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्रने निषेध केला आहे. तर जिवाची पर्वा न करता कोरोनाशी दोन हात करत अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या डॉक्टरांना कोरोना काळातही लक्ष्य केले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
लातूर येथील अल्फा सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. दिनेश वर्मा यांच्यावर 29 जुलैला प्राणघातक हल्ला करण्यात आला. उदगिर येथील एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णाच्या मुलाने सुऱ्याने डॉ. वर्मा यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर दोषीविरोधात साथ नियंत्रण कायद्यातील नव्या दुरुस्तीनुसार कडक कारवाई व्हायला हवी होती. पण याप्रकरणी अशी कोणतीही कारवाई न करता केवळ 307 कलम लावण्यात आले आहे. यावर आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अल्फा सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. तेव्हा येथील डॉक्टरासह सर्व कर्मचारी कोविड योध्दा म्हणून काम करत असताना त्यांच्यावर हल्ले होणे योग्य नसल्याचे म्हणत कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. त्याचवेळी डॉक्टरांच्या इतर समस्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. आवाजवी बिल लावले म्हणून खासगी रुग्णालयाविरोधात होणाऱ्या कारवाईबद्दल तसेच कोरोनासाठी लावण्यात आलेल्या दराबद्दलही आयएमएने नाराजी व्यक्त करत याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.