लातूर -उदगीर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने दोन लाखांचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. या कारवाईत अवैध दारूच्या वाहतूकीसाठी वापरण्यात आलेल्या टेम्पोसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
उदगीरमध्ये दोन लाखांचा अवैध दारूसाठा जप्त - अवैध दारू साठा उदगीर
व्यंकटराव पाटील हे टम्पोतून अवैध दारूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एम.एच.१३ सी.यु.०४२८ या वाहनाचा पाठलाग करत देवर्जन-हनुमंतवाडी पाटी परिसरात हा दारुसाठा जप्त केला. सुरवातीला पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली. मात्र, या प्रकरणाचा तालुक्यात गाजावाजा होताच पोलिसांना कारवाई करावी लागली.
हेही वाचा -नागपूरमध्ये अवैध दारूसाठा जप्त, तपास सुरू
व्यंकटराव पाटील हे टम्पोतून अवैध दारूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एम.एच.१३ सी.यु.०४२८ या वाहनाचा पाठलाग करत देवर्जन-हनुमंतवाडी पाटी परिसरात हा दारुसाठा जप्त केला. सुरुवातीला पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली. मात्र, या प्रकरणाचा तालुक्यात गाजावाजा होताच पोलिसांना कारवाई करावी लागली. परिसरात पोलिसांच्या या अजब वर्तणुकीची चर्चा सुरू आहे. मारोती घोडके यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.