लातूर- निलंगा तालुक्यातील म्हसोबावाडी येथे अवैधरीत्या विदेशी दारुची विक्री होत आहे. यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उस्मानाबाद व लातूर भरारी पथकाने छापा टाकला. यात ८ लाख ६९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लातुरात अवैध दारू विक्री; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त - अवैध दारू लातूर
म्हसोबावाडी येथे एका हॅाटेलमध्ये अवैधरीत्या विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार उस्मानाबाद व लातूर येथील भरारी पथकाने कारवाई केली. यात एकून ८ लाख ६० हजार ५२० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा-दिल्ली विधानसभेसाठी रचला राम मंदिराचा 'पाया', शिवसेनेचा भाजपवर निशाणा
तालुक्यातील औराद शहाजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या म्हसोबावाडी येथे एका हॅाटेलमध्ये अवैधरीत्या विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार उस्मानाबाद व लातूर येथील भरारी पथकाने कारवाई केली. यात एकूण ८ लाख ६० हजार ५२० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. काशिनाथ तोरसल्ले याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक मिलिंद गरुड, दुय्यम निरीक्षक एस पी काळे, जे एस राऊत, जवान राजेश गिरी, महेश कंकाळ, विशाल चव्हाण, इजाज शेख यांनी केली.