लातूर - लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प आहेत. मात्र, उन्हाळ्यात आईस्क्रीमची विक्री होईल या आशेपोटी साठवणूक केलेल्या आईस्क्रीम गोडाऊनला आग लागल्याची घटना औसा येथे घडली. यामध्ये तब्बल 12 लाखाचे नुकसान झाले आहे.
दुष्काळात तेरावा : औशात आईस्क्रीम गोदामाला आग; 12 लाखाचे नुकसान - aausa latur
पोलिसांनी समयसूचकता दाखवत नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण केले. मात्र, तोपर्यंत अंदाजे 12 लाखाचे नुकसान झाले होते.
औशात आईस्क्रीम गोदामाला आग; 12 लाखाचे नुकसान
शहरातील मुख्य रस्त्यावर योगेश गोपिकीशन तापडिया यांचे दुकान आहे. त्यांच्याकडे आईस्क्रीमची औसा तालुक्याची डिलरशीप असून लॉकडाऊन पूर्वी त्यांनी 6 लाखाचा माल स्टॉक करून ठेवला होता. गुरुवारी सकाळी शॉर्टसर्किटने अचानक गोडाऊनला आग लागली. यामध्ये वायरिंग आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे.
पोलिसांनी समयसूचकता दाखवत नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण केले. मात्र, तोपर्यंत अंदाजे 12 लाखाचे नुकसान झाले होते.