महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बायको माहेरी येत नसल्याने पतीने केली आत्महत्या

विठ्ठल दारू पिऊन पत्नीलासोबत चल म्हणून जबरदस्ती करीत होता. त्यामुळे सासऱ्याने 'तू आमच्या घराबाहेर जा' असे सुनावले. याचा राग मनात धरून दारूच्या नशेत विठ्ठलने गावाजवळील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतला.

लातुरात बायको माहेरी येत नसल्याने पतीने केली आत्महत्या

By

Published : Nov 4, 2019, 6:49 PM IST

लातूर - जळकोट तालुक्यातील मरसांगवी गावात विठ्ठल शंकर धुळगुंडे (वय २५) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बायको माहेरी येत नसल्याच्या कारणाने झालेल्या वादात हे कृत्य विठ्ठलने केल्याचे उघड झाले आहे.

लातुरात बायको माहेरी येत नसल्याने पतीने केली आत्महत्या

हेही वाचा-शेअर बाजाराचा सर्वोच्च विक्रमी उच्चांक; 269 अंशाने वधारून पोहोचला 40,435 वर

काय आहे नेमके प्रकरण-

विठ्ठल धुळगुंडे हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील माळेगावचा रहिवासी आहे. तो काही दिवसांपासून मरसंगवी गावात त्याच्या सासरवाडी राहत होता. तो बायकोला घरी घेऊन नेण्यासाठी सासरवाडीत आला होता. विठ्ठल दारूच्या आहारी गेल्याने त्याची पत्नी त्याला कंटाळून बऱ्याच दिवसांपासून माहेरी वडिलांकडे राहत होती. विठ्ठल बायकोला सोबत नेण्यासाठी दररोज विनवीत होता. मात्र, विठ्ठल दारू पिऊन पत्नीला सतत मारहाण करत असल्याने पत्नी विठ्ठलसोबत जाण्यास राजी होत नव्हती. त्यामुळे तो तेथेच बायको सोबत राहत होता.

दरम्यान, विठ्ठल दारू पिऊन पत्नीलासोबत चल म्हणून जबरदस्ती करीत होता. त्यामुळे सासऱ्याने 'तू आमच्या घराबाहेर जा' असे सुनावले. याचा राग मनात धरून दारूच्या नशेत विठ्ठलने गावाजवळील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. याप्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात १७४ सीआरपीसी प्रमाणे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एपीआय बोइनवाड करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details