लातूर - बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून, परीक्षा संपेपर्यंत विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर तणाव दिसणार आहे. तर वर्षभर केलेली तयारी आणि विविध उपक्रमातून पार पडलेल्या सराव परीक्षा यामुळे विद्यार्थी दडपणाखाली असले तरी पेपर संपताच हसतमुखाने बाहेर पडतील, असा विश्वास प्राध्यापक व्यक्त करत आहेत. परीक्षा नियोजन नीट केले तर दहावीची असो की बारावीची परीक्षा असो विद्यार्थ्यांवर ताण येणार नसल्याचे प्राध्यापक आणि पालकांनी उच्चार केला.
वर्षभर बारावी परीक्षेची तयारी; विद्यार्थ्यांवर दडपण अन् प्राध्यापकांचा सल्ला हेही वाचा -'या' कारणांनी चांदीच्या दरात होतेय चढ-उतार; जळगावात प्रति किलो ४७.२०० रुपये
लातूर बोर्डमध्ये ८६ केंद्रावर ३६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांवर दडपण येते म्हणून नेमकी काय तयारी केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या मनातली धाकधूक वेधण्याचा ईटीव्ही भारतने प्रयत्न केला होता. मात्र, वर्षभर तयारी केली असली तरी परीक्षेच्या दिवशी महाविद्यालयाची पायरी चढताना दडपण हे येतेच पण वर्षभर केलेल्या तयारी यामुळे पेपर उत्तम जाईल, असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. तर विद्यार्थी तणावमुक्त राहावा याकरिता महाविद्यालयाने राबविलेले उपक्रम प्राध्यापकांनी सांगितले. आता वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभ्यासाचे नियोजन केले जाते. याकरिता विद्यार्थी आणि पालकांकडून ही तयारी केली जाते. येथील दयानंद महाविद्यालयाने तर प्रत्येक पेपरच्या पूर्वसंध्येला तयारी कशी करायची आणि तणावमुक्त कसे राहायचे याविषयीचे मार्गदर्शन सुरू केले आहे.
विद्यार्थ्यांची तयारी आणि प्रत्यक्ष पेपरला जात असतानाची झालेली अवस्था याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या कालावधीत कशी काळजी घ्यावयाची याविषयी आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा.
हेही वाचा -'जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवू शकत नाहीत'