महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कासार बालकुंदा गावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन, हिंदु किर्तनकाराच्या हस्ते मस्जीदचा शुभारंभ - Kasar Balakunda village in Latur district

मुस्लिम समाजाच्या नवीन बांधलेल्या प्रार्थना स्थळाचा फित कापून हिंदू धर्माच्या किर्तनकाराने केले शुभारंभ... कासार बालकुंदा गावात धार्मीक एकतेचे दर्शन.. सर्वधर्म समभाव रामायण गाथा प्रवचनकाराच्या हस्ते मस्जीदचा शुभारंभ...

कासार बालकुंदा गावात हिंदू मुस्लिम ऐक्य

By

Published : Nov 9, 2019, 9:22 AM IST

लातुर - अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या आयोध्या येथिल राम मंदिर व बाबरी मस्जीद या हिंदू मुस्लिम दोन्ही धर्माच्या प्रार्थना स्थळाच्या निकालाकडे लागले असतानाच, मराठवाडा या संताच्या भूमीतील लातूर जिल्ह्यातील कासार बालकुंदा या गावात हिंदू मुस्लिम धार्मिक सलोखा पाहेला मिळाला...

हेही वाचा... 'बाबरी निकालावर उत्सुकता ताणलेली, मात्र संयम बाळगा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा'

कासार बालकुंदा हे गाव कर्नाटक राज्याच्या सिमेवर बसलेले आहे. या गावात मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम धर्माचे लोक राहतात. मुस्लिम धर्मातील लोकांनी या गावात मोठी मस्जीद बांधली आहे. या नवीन मस्जीदचे काम पूर्ण झाले. सध्या गावात अद्यकवी वाल्मिकी यांच्या जयंती निमित्त वाल्मिकी रामायण सप्ताह उभा करण्यात आला आहे. गावात भजन, किर्तन, प्रवचन असे अनेक धार्मीक कार्यक्रम चालू आहेत. याचे औचित्य साधून आज मुस्लिम समाजाच्या वतीने दहा हजार लोकवस्ती असलेल्या कासार बालकुंदा गावाला गावजेवन देण्यात आले होते, तसेच सर्व जाती धर्माचे लोक एकञ येऊन हा मस्जीदचा शुभारंभ केला.

हेही वाचा... 'या' पाच न्यायमूर्तींचे पीठ देणार अयोध्येचा ऐतिहासिक निकाल

प्रवचनकार महाराच्या हस्ते फित कापली आणि उदघाटन केले. तसेच त्यांच्या प्रवचनाने समाप्ती करण्यात आली. हिंदू मुस्लिम धर्मातील समाज बांधवाच्या चालीरीती भिन्न असल्या तरी भगवतगीता आणि कुरान या धर्म ग्रंथात समाजरक्षण, मानवता दर्शन, मानवता धर्माचे रक्षण करण्याचा उपदेश केल्याचे मुस्लिम मौलवी आणि रामायण प्रवचनकार अप्पाजी महाराज कोरणेश्वर उस्तुरी मठ यांनी सांगितले. राजकारणी लोक माणसे तोडतात, धर्माधर्मात भांडणे लावतात मात्र धार्मीक गुरू ते हिंदू असतील वा मुस्लिम माणसे जोडण्याचे काम करतात, अयोध्या येथील राम मंदिरा बाबतचा निकाल न्यायालय काहीही असो, त्याचे आम्हाला काही देणेघेणे नाही. आम्ही मात्र माणूसकी धर्म पाळत सलोख्याने शांततेने एकत्र राहणार आहोत, असे दोन्ही धर्माच्या धर्मगुरूंनी सांगितले. यावेळी गावातील व पंचक्रोशीतील अनेक हिंदू मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details