महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूरच्या औराद शाहजनीत पाणीच पाणी; सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा कहर

जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील औराद शहाजनीमध्ये बुधवार सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस झाला. पावसाचे पाणी मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक दुकानात शिरले. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं तर, शेतकऱ्यांचे खरिपातील सोयाबीनचेही नुकसान झाले आहे.

औराद शाहजनीत मुसळधार पाऊस
औराद शाहजनीत मुसळधार पाऊस

By

Published : Sep 17, 2020, 5:30 PM IST

लातूर -जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. निलंगा तालुक्यातील औराद शाहजनी येथे सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे अनेक घरात आणि दुकानात पाणी घुसले आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

औराद शाहजनीत मुसळधार पाऊस

जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने पाठ फिरवली होती. परंतु, या आठड्याच्या सुरुवातीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. निलंगा तालुक्यातील औराद शाहजनी, तागरखेडा, हलगरा या गावांच्या शिवारात पावसाने कहर केला असून त्यामुळे खरिपातील सोयाबीनचे नुकसान झाले आहे. शिवाय गावभागात पाणी घुसल्याने नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. दरवर्षी अवर्षणाच्या गडद छायेत असलेल्या या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, हा नुकसानीचा पाऊस असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

बुधवार पाठोपाठ आज गुरुवारीही पावसाने हजेरी लावली. यातच औराद शाहजनी ते तागरखेडा या गावादरम्यानचा ओढा दुथडी भरून वाहत असल्याने दोन्ही गावचा संपर्क तुटला आहे. आतापर्यंत मराठवड्यात सर्वात कमी पाऊस हा लातूर जिल्ह्यात झाला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर, काही भागात मुसळधार पाऊस होत असल्याने खरीपाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा -पालकमंत्री देशमुखांच्या बाभळगावातील गढीसमोर मराठा क्रांती मोर्चाचा घंटानाद

ABOUT THE AUTHOR

...view details