महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निलंग्यात पुन्हा अवकाळी पाऊस; फळबागांचे आतोनात नुकसान - latur rain

गेल्या दोन दिवसापूर्वी निलंगा तालुक्यातील औराद शा. परिसरासह अनेक गावात वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस झाला होता. ३० मिनिटांमध्ये ५२ मिली मिटर पाऊस झाला. मात्र, आज पुन्हा अवकाळी पाऊस झाला.

heavy rain in latur
निलंग्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरवात...

By

Published : Apr 21, 2020, 6:51 PM IST

लातूर - गेल्या दोन दिवसापूर्वी निलंगा तालुक्यातील औराद शा. परिसरासह अनेक गावात वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस झाला होता. ३० मिनिटांमध्ये ५२ मिली मिटर पाऊस झाला. मात्र, आज पुन्हा अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. औराद शा, तगरखेडा, सावरी माने, जवळगा, तांबरवाडी, हलगरा ताडमुगळी आणि अंबुलगा बु या गावात मोठा पाऊस झाला.

निलंग्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरवात...

सध्या जगभरात कोरोना या महामारीने थैमान घातल्याने संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात भाजीपाला टरबूज, खरबुज, आणि आंबा फळ शेतातच सडून जात आहे. रानावर सडत आहेत विक्री पूर्णपणे बंद आहे पण जो माल हातातोंडाशी आला आहे तो अवकाळी पावसाने त्याचा सडा होत असल्याने लहान मोठ्या शेतकऱ्यांवर उपास मारीची वेळ आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details