लातूर- जिल्हा अद्यापपर्यंत पावसापासून दूर राहिला आहे. मात्र, परतीच्या पावसादरम्यान वातावरण बदलले असून गुरुवारी रात्री शहरासह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे लातूरकारांच्या आशा पल्लवीत झाल्या असून यामध्ये सातत्य राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लातुरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत
हंगामाच्या सुरवातीपासून पावसाने जिल्ह्यावर अवकृपा दाखवली आहे. त्यामुळे खरिपातील पिके तर हातची गेलीच आहे. शेतकऱ्यांना चिंता आहे ती रब्बी आणि जनावरांच्या चाऱ्याची. भर पावसाळ्यात लातूर जिल्ह्यात 70 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
हेही वाचा- रितेश देशमुखने शेअर केला 'बिग बीं'चा ३७ वर्षापूर्वीचा व्हिडिओ
हंगामाच्या सुरवातीपासून पावसाने जिल्ह्यावर अवकृपा दाखवली आहे. त्यामुळे खरिपातील पिके तर हातची गेलीच आहे. शेतकऱ्यांना चिंता आहे ती रब्बी आणि जनावरांच्या चाऱ्याची. भर पावसाळ्यात लातूर जिल्ह्यात 70 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर सर्वच प्रकल्प हे कोरडेठाक आहेत. त्यामुळे लातुकारांना सध्या 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी रात्री दमदार पाऊस झाल्याने जलस्रोतांमध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पावसाला सुरुवात होताच शहरातील काही भागाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. या पावसाने खरीपातील पिकांना जीवदान मिळणार नाही परंतु लातूरकारांची पाण्याची चिंता काही प्रमाणात का होईना कमी होईल हे नक्की. सरासरीच्या तुलनेत 55 टक्के पाऊस झाला असून शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण हे कोरडेठाक आहे. त्यामुळे पावसामध्ये सातत्य राहणे गरजेचे आहे.