लातूर - मेघगर्जनेसह लातूर ग्रामीण आणि रेणापूर तालुक्यात गुरुवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे नदी-नाले भरुन वाहिले असले तरी हा पाऊस काहीच गावांमध्ये झाला आहे. येथील काही गावांना पाऊस वारंवार हुलकावनी देत आहे. त्यामुळे दुष्काळाची सावट असलेल्या या गावांमध्ये चिंतेची लाट पसरली आहे.
लातुरात परतीचा मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा - परतीचा पाऊस लातूर
लातूर जिल्ह्याकडे पावसाने आद्यपर्यंत पावसाने पाठ फिरवली होती. गुरुवारी दुपारी लातूर शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे मुरुड, कासारखेड गावच्या ओढ्यांना पाणी आले होते. आतापर्यंतच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. यामुळे रब्बी हंगामाबाबत दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
हेही वाचा-पुण्यात चंद्रकांत पाटीलांनी शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज
लातूर जिल्ह्याकडे पावसाने आद्यपर्यंत पावसाने पाठ फिरवली होती. गुरुवारी दुपारी लातूर शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे मुरुड, कासारखेड गावच्या ओढ्यांना पाणी आले होते. आतापर्यंतच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. यामुळे रब्बी हंगामाबाबत दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. उशिरा का होईना हा पाऊस झाला असला तरी काही भागापूरताच मर्यादित राहीला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. रेणापूर तालुक्यातील मळवीट कासारखेड, लातूर तालुक्यातील मुरुड, मुरुड अकोला या भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसामध्ये सातत्य राहण्याची गरज असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.