लातूर - निलंगा तालुक्यातील औरादसह परिसरातील अनेक गावात आज ४ वाजता अचानक वादळी वारा आणि गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. गोठ्यावरील पञे उडल्याने अनेक जनावरांना गारांचा मार लागला आहे. झाडे मोडून पडल्याने जनावरे जखमी झाले आहेत. कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमध्ये अडकलेले टरबूज, खरबूज, पपई, टमाटे या फळबागावर गारा पडल्याने रानात सडा पडला आहे.
अवकाळी पावसाने औरादसह परिसरातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान, फळबागांनाही बसला फटका - लातूर पाऊस बातमी
आज झालेल्या अवकाळी पावसामुळे काही लहान ओढ्यांना पाणी थांबल्याने शेतकऱ्यांना पाण्यातून घराकडे जाताना कसरत करावी लागली. ज्वारी, मका, जनावरांसाठी रचून ठेवलेला कडबा व चारा याचे मोठे नुकसान झाले आहेत, तर वाऱ्याने चारा रानावर उडून गेला आहे.
तगरखेडा परिसरातील बालाजी थेटे यांचे फळबाग पिकांचे दहा लाख रूपयांचे शेडनेट वाऱ्याने उडून गेले आहे, तर मध्ये असलेला भाजीपाला पूर्णपणे गाराचा मार लागून खराब झाला आहे. या ५२ मिमी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारीचे पीक संपूर्णपणे आडवी पडली आहेत आणि मोहन मारूती बोंडगे यांची गाय वीज पडून जागीच ठार झाली आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने झाडे उन्मळून रस्त्यावर पडले आहेत.
आज झालेल्या अवकाळी पावसामुळे काही लहान ओढ्यांना पाणी थांबल्याने शेतकऱ्यांना पाण्यातून घराकडे जाताना कसरत करावी लागली. ज्वारी, मका, जनावरांसाठी रचून ठेवलेला कडबा व चारा याचे मोठे नुकसान झाले आहेत, तर वाऱ्याने चारा रानावर उडून गेला आहे. औराद परिसरातील तगरखेडा, हलगरा, सावरी येथील शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तयार करण्यात यावे व आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.