महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Corona: आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर;वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची माहिती - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

परीक्षांचे अंतिम वेळापत्रक निश्चित करताना केंद्रीय परिषदांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पर्याप्त कालावधी उपलब्ध करून देण्यात यावा,अशा शिफारशी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

health edu minister informed  university exams postponed health
Corona: आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर;वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची माहिती

By

Published : May 2, 2020, 11:27 AM IST

लातूर- कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत या सत्रातील 2020 च्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा ह्या लांबणीवर गेल्या आहेत. परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाटी गठीत करण्यात आलेल्या शिफारशीनुसार या परीक्षा पुढील सुचनेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर आणि प्रा. डॉ. मोहन खामगावकर, प्रति-कुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर 2020 च्या परीक्षा पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात, या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या प्रमुख संस्था, अध्यापक, पालक व विद्यार्थ्यांशी चर्चा करुन ठरवावे, असा निर्णय घेण्यात आला.

परीक्षांचे अंतिम वेळापत्रक निश्चित करताना केंद्रीय परिषदांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पर्याप्त कालावधी उपलब्ध करून देण्यात यावा,अशा शिफारशी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

परीक्षांच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच विद्यापीठाच्या कोणत्याही परिपत्रकाची खातरजमा करण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील माहिती ग्राह्य धरण्यात यावी, असे आवाहनही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details