लातूर - हिवताप व हत्तीरोग विभागाचे हस्तांतरण आता जिल्हा परिषदेकडे केले जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या हिवताप व हत्तीरागे विभागातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी एकत्र येत राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार असून परीपत्रक रद्द करण्याची मागणी कर्मचऱ्यांनी केली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांवर निष्काळजीपणा आणि गैरप्रकार आढळून आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कारभारात सुधारणा करण्यासाठी या विभागाचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्याचे परीपत्रक काढण्यात आले आहे. अधिकारी, कर्मचारी आणि संघटनांना कोणतीही माहिती न देता हा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.