महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Hand Broken Due To Anger : पानपट्टीवरील उधारी मागितल्याने साडेतीनशे रुपयांसाठी दोन्ही हात मोडले - hands have broken due to anger

पानपट्टीवरील 350 रुपयांची उधारी मागितल्यामुळे (Beating for borrowed money) एका 30 वर्षीय तरुणाचे दोन्ही हात मोडल्याची (Youth hands have broken) निर्दयी घटना लातूरच्या औसा तालुक्यातील मौजे बुधोडा येथे घडली आहे. यासंदर्भात औसा पोलिसांत पाच तरुणांविरोधात गुन्हा दाखल (case filed against hand breakers) करण्यात आला आहे. Latest news from Latur, Latur Crime

Hand Broken Due To Anger
साडेतीनशे रुपयांसाठी दोन्ही हात मोडले

By

Published : Nov 2, 2022, 1:41 PM IST

औसा (लातूर ) :पानपट्टीवरील 350 रुपयांची उधारी मागितल्यामुळे (Beating for borrowed money) एका 30 वर्षीय तरुणाचे दोन्ही हात मोडल्याची (Youth hands have broken) निर्दयी घटना लातूरच्या औसा तालुक्यातील मौजे बुधोडा येथे घडली आहे. यासंदर्भात औसा पोलिसांत पाच तरुणांविरोधात गुन्हा दाखल (case filed against hand breakers) करण्यात आला आहे. Latest news from Latur, Latur Crime

उधारी मागितल्याच्या रागातून मारहाण -लातूर ते औसा रोडवरील बुधोडा येथील रहिवासी सिकंदर चांदसाब शेख (वय 30) या तरुणाची गावातील तलाठी ऑफिसच्या शेजारी पानटपरी आहे. गावातीलच आरोपी दिपक संजय कांबळे याला सिकंदरने पानटपरीची 350 रुपयांची उधारी मागितली. याचा राग मनात धरुन दिपकने त्याचे अन्य आरोपी सुनिल मोहन कांबळे , अनिल मोहन कांबळे, रत्नदीप मोहन कांबळे, विक्की गायकवाड (सर्व रा. बुधोडा) यांना सोबत घेत सिकंदर यांची पानटपरी गाठली. यातील आरोपी दिपक व सुनिल या दोघांनी लोखंडी रॉड, काठीने सिकंदरचे दोन्ही आत मोडले. तर रत्नदीप कांबळे याने सिकंदरच्या हाताच्या बोटावर मारुन जखमी केले.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल-या संदर्भात सिकंदर शेख यांने दिलेल्या फिर्यादीवरुन औसा पोलिसांत गुरनं 359/22 कलम 307, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भादंवि अन्वये औसा पोलीस ठाण्यात पाच तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details