महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना फटका : हातचे काम गेले अन् कमवता पुण्यात अडकला...कुटुंबावर उपासमारीची वेळ - कोरोना संकट लातूर

नांदगाव येथील मंजुळाबाई बांडे यांना नृसिंह बांडे आणि देवराव बांडे अशी मुले आहेत. त्यांना चार एक्कर पण कोरडवाहू जमीन आहे. या जमीनीतून कुटुंब चालेल असे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे दोन्ही मुले रोजंदारी करतात. तर त्यांना आधार म्हणून देवराव यांच्या मुलगा पुण्यात वाहन चालक आहे. तो महिन्याकाठी घरी पैसे पाठवतो. त्यामुळे कुटुंबात सर्व काही सुरळीत चालते.

hand-work-was-gone-dur-to-corona-virus-in-latur
हातचे काम गेले अन् कमवता पुण्यात अडकला...

By

Published : Apr 1, 2020, 1:42 PM IST

लातूर - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचार बंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. चाकूर तालुक्यातील नांदगाव येथील एका बांडे कुटुंबावरही अशीच उपासमारीची वेळ आली आहे. या कुटुंबाचा कर्ता पुण्यात अडकला आहे. त्यामुळे कुटुंब चिंतेत आहे.

हातचे काम गेले अन् कमवता पुण्यात अडकला...

हेही वाचा-सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात, शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन

नांदगाव येथील मंजुळाबाई बांडे यांना नृसिंह बांडे आणि देवराव बांडे अशी मुले आहेत. त्यांना चार एक्कर पण कोरडवाहू जमीन आहे. या जमीनीतून कुटुंब चालेल असे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे दोन्ही मुले रोजंदारी करतात. तर त्यांना आधार म्हणून देवराव यांच्या मुलगा पुण्यात वाहन चालक आहे. तो महिन्याकाठी घरी पैसे पाठवतो. त्यामुळे कुटुंबात सर्व काही सुरळीत चालते.

मात्र, कोरोना आला आणि सर्व कामधंदे बंद झाले. राज्य लाॅकडाऊन झाले. त्यामुळे देवराय यांचा मुलगा पुण्यातच अडकून पडला. कुटुंबाला पैसेही मिळणे बंद झाले. बांडे कुटुंबात एकूण 11 सदस्य आहेत. त्यामुळे बांडे कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे.

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज आठवा दिवस आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details