लातुर -लोकसभेची निवडणूक ही देशाच्या हिताची होणार आहे. या मतदानाच्या प्रक्रियेतून नव भारत निर्माण होणार असून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले आहे. त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत औरद शहजनी येथे आज सकाळी ११ वाजता मतदान केले.
लोकसभेच्या मतदान प्रक्रियेतून नव भारत निर्माण होणार - पालकमंत्री - voting
पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आपल्या कुटुंबासमवेत औरद शहजनी येथे आज सकाळी ११ वाजता मतदान केले.
लोकसभेच्या मतदान प्रक्रियेतून नव भारत निर्माण होणार - पालकमंत्री
ही निवडणूक देशाची नवनिर्मिती होणार आहे. तरुण मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रशासनाने अनोखे उपक्रम राबवून मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. वाढत्या उन्हापासून बचाव होण्यासाठी केंद्रावर मंडप उभारण्यात आले आहेत. या स्तुत्य उपक्रमाला लातुरकर साथ देत असून मतदानाचा टक्का वाढणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.