महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून पालकमंत्र्यांची नामी शक्कल - cropPanchanam News Latur

जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरही जात आहेत. मात्र, या नुकसान भरपाईच्या मदतीपासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहू नये, म्हणून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी गावातच ग्रामसभा घेऊन सर्व शेतकऱ्यांची कागदपत्रे जोडून पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गावकऱ्यांशी चर्चा करताना पालकमंत्री व अधिकारी

By

Published : Nov 7, 2019, 2:56 PM IST

लातूर- जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरही जात आहेत. मात्र, या नुकसान भरपाईच्या मदतीपासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहू नये, म्हणून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी गावातच ग्रामसभा घेऊन सर्व शेतकऱ्यांची कागदपत्रे जोडून पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे वेळेची बचत आणि मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

माहिती देताना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर

खरीप अंतिम टप्प्यात असताना परतीच्या पावसाने अवकृपा दाखवली आणि होत्याचे नव्हते झाले. यानंतर पीक पाहणीसाठी राजकीय नेत्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांवरील संकट लक्षात घेता अधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

नुकसान पाहणी दरम्यान शेतकऱ्यांकडून विमा कंपनी अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून अडवणूक करण्याची भूमिका घेत असल्याने पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती. जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या हेतूने एकाच दिवशी ग्रामसभेचे आयोजन करावे व सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तक्रारी घ्याव्यात, असे संभाजी पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा-लातूरकरांना किंचित दिलासा; आता १० दिवसाला होणार पाणीपुरवठा

त्याचबरोबर, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीने शेतकरी कोलमडून पडले आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची कागदपत्रे मागून पिळवणूक न करता सरसकट पंचनामे करावेत. जिल्ह्यातील एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे आदेश पालकमंत्री संभाजी पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. अशाप्रकारे पंचनामे करून घेणारा लातूर हा पहिलाच जिल्हा असेल.

हेही वाचा-'कर्जमाफीस पात्र म्हणून सत्कार झाला, पण कर्जमाफी झालीच नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details