निलंगा (लातूर)- लातूर येथील अण्णाभाऊ साठे महामंडाळामध्ये शासकीय सेवेत असलेल्या एका कर्मचाऱ्याने निलंगा शहरातील हाडगा रोडवरील पाझर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सूर्यकांत कृष्णाजी एबोटे (वय ३०. रा भिल्ल वस्ती) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
निलंग्यात शासकीय सेवेतील कर्मचाऱ्याची तलावात उडी घेऊन आत्महत्या - suryakant ebote suicide nilanga
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पाझर तलावत एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर व्यक्तीचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला व तपासणीत मृतदेह एबोटे यांचा असल्याचे समजले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पाझर तलावत एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर, व्यक्तीचा मृतदेह तलावातून बाहेर काढल्यानंतर तपासातून मृतदेह एबोटे यांचा असल्याचे समजले. त्यानंतर एबोटे यांच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. नंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला. एबोटे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा-अखेर मांजरा धरण मृतसाठ्याबाहेर; लातूरकरांना दिलासा