लातूर - स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त लातूर महानगरपालिकेच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. मनपाच्या सर्व घंटागाड्या एकत्र करून शहरातील मुख्य मार्गावर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. शिवाय स्वच्छतेबाबत सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामूहिक शपथ घेतली.
शहरातील कचऱ्याचे संकलन करण्यासाठी मनपाच्या जवळपास 130 घंटागाड्या आहेत. दररोज 'स्वच्छ शहर, सुंदर शहरा'साठी धावणाऱ्या घंटागाड्यांनी रविवारी स्वच्छतेबरोबर जनजागृतीही केली. डॉ. आंबेडकर पार्क येथे संत गाडगेबाबा यांना अभिवादन करून या अनोख्या रॅलीला सुरवात झाली होती. महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी शुभारंभ केला. मनपाचे स्वछता कर्मचारी आणि अधिकारी यांच्या परिश्रमामुळे लातूर शहर हे स्वच्छ आणि सुंदर राहत आहे. यामध्ये सातत्य राहणे आवश्यक असून स्वच्छतेसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.
वसुंधरा अभियानाचा प्रारंभ -