लातूर -राष्ट्रसंत तथा लिंगायत समाजाचे धर्मगुरु डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार हे भक्तीस्थळावर व्हावेत, अशी इच्छा डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे तसेच कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री अकराच्या दरम्यान दफनविधी करण्यात आला आहे. अहमदपूरकर मठाचे उत्तराधिकारी राजशेखर स्वामी आणि हडोळती मठाचे उत्तराधिकारी यांनी विधीवत पूजा करून डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांची अंतिम इच्छा पूर्ण ; भक्तीस्थळावर अंत्यसंस्कार - shivling shivacharya maharaj last wish
लिंगायत समाजाचे धर्मप्रसारक तसेच राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे वयाच्या 104 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले. गेल्या आठवड्यात महाराजांनी तप अनुष्ठान केले होते. त्यामुळे त्यांची प्रकृतीही खालावली होती. नांदेड येथील नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरू होते. मंगळवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नांदेडहून त्यांचा मृतदेह अहमदपूर येथील भक्तीस्थळ येथे आणण्यात आला.

अंत्यसंस्काराच्या वेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आ.अभिमन्यू पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शिवाय त्यांना कोरोना असल्याने विशेष काळजी घेण्यात आली होती. लिंगायत समाजाच्या गेल्या 3 पिढ्यांवर त्यांचा प्रभाव राहिला आहे. अखेर मठाचा आणि उत्तराधिकारी याचा प्रश्न निकली काढल्यानंतर डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी निरोप घेतला आहे. भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाविकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.