लातूर - दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. शहरातील ओसवाडी परिसरात हा प्रकार घडला असून, यामध्ये राहुल मनाडे हा तरुण मृत पावला आहे.
राहुल मनाडे आणि अमोल उर्फ गणेश गायकवाड या दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढू नये यासाठी गणेशच्या वडीलांनी राहुल मनाडेला घरी बोलावले. त्यावेळी हा वाद विकोपाला गेला. यानंतर रागाच्या भरात गणेश याने घरातील बंदूक बाहेर काढून राहुल मनाडेच्या छातीवर गोळी झाडली. राहुलला तत्काळ सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू झाला आहे. गणेश गायकवाडचे वडील निवृत्त सैनिक आहेत.
हेही वाचा दिल्लीत गुंडाच्या टोळक्याचा भरदिवसा पोलिसांवर गोळीबार