महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूर मधील तीन रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजारावर मोफत उपचार - महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराचे प्रमाण वाढले आहे,या आजारावरील उपचाराकरिता शस्त्रक्रियेची गरज असते. या आजारावरील उपचारासाठी येणारा खर्च अधिक असल्याने रुग्णांवर आर्थिक संकट येऊ नये, यासाठी राज्य सरकारने रुग्णांना या आजारावर महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचाराची परवानगी दिली आहे.

जिल्हा प्रशासनाचे आवाहन
जिल्हा प्रशासनाचे आवाहन

By

Published : May 29, 2021, 8:01 AM IST

लातूर - राज्यात कोरोनामुक्त रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराचे प्रमाण वाढले आहे, या आजारावरील उपचाराकरिता शस्त्रक्रियेची गरज असते. या आजारावरील उपचारासाठी येणारा खर्च अधिक असल्याने रुग्णांवर आर्थिक संकट येऊ नये, यासाठी राज्य सरकारने रुग्णांना महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचाराची परवानगी दिली आहे.

तीन रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजारावर मोफत उपचार

शासन निर्देशानुसार लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर, यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय लातूर आणि विवेकानंद रुग्णालय, लातूर या तीन रुग्णालयात, महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसिस आजारावर मोफत उपचार दिले जाणार आहेत. सदर तीन रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांना उपचाराकरिता आवश्यक असणारे 'अॅम्फोटेरीसीन-बी' इंजेक्शन मोफत देण्यात येणार आहे.

कागदपत्रे आवश्यक

उपचाराकरिता पात्र रुग्णांकडे रुग्णांची वैद्यकीय फाईल, रेशन कार्ड ,आधारकार्ड किंवा शासनमान्य ओळखपत्र असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक म्युकरमायकोसिस रुग्णांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा-सोलापुरात नवीन 873 जणांना कोरोना, 25 मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details